⁠  ⁠

MPSC गट-क परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Group C Recruitment 2022 : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यात या परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आलेली आहे. MPSC Group C Bharti

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्रान्वये कर सहायक संवर्गाकरीता अतिरिक्त ३६७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.

तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५ डिसेंबर, २०२२ पत्राद्वारे बृहन्मुंबईतील शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचे अतिरिक्त ४४२ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ मधून भरावयाच्या संवर्गांकरीता एकूण पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 06
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 09

3) कर सहाय्यक, गट-क 114 481
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – पूर्वी 89
आता वाढून एकूण पदे 510
5) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – पूर्वी 10 आता वाढून एकूण पदे 31

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील पदे वाढून आता 1037 पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 वाचण्यासाठी इथे क्लीक करा

Share This Article