MPSC उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.दरम्यान, MPSCने पदसंख्येत वाढ केल्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 करीता दिनांक 11 मे, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील विविध 8 संवर्गाचे एकूण 161 रिक्त पदे जाहीर आले होते. आता आणखीन 15 संवर्गाचे एकूण 462 रिक्त जागांची भर यात पढली आहे त्यामुळे MPSC Rajyaseva 2022 साठी एकूण 623 रिक्त जागा झाले आहेत. संवर्गानुसार MPSC Rajyaseva Vacancy 2022 तपशील खाली देण्यात आले आहे.
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
8) तहसीलदार, गट अ-25
9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
13) सहायक प्रकल्प अधिकारी, गट ब-42
खालील प्रमाणे विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२२ मधून एकूण ६२३ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
उपजिल्हाधिकारी संवर्गाकरीता वयोमर्यादा दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी गणण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर सर्व पदांकरीता वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद दिनांकास म्हणेजच दिनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी गणण्यात येईल.
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक:- क्रमांक:एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.६१/कार्या-१२, दिनांक १७ डिसेंबर, २०२१ अनुसार दिनांक ०१ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर, २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.