MPSC PSI Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 615
पदाचे नाव: पोलीस उपनिरीक्षक
पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]
वेतनश्रेणी : 38,600 ते 1,22,800/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023
पूर्व परीक्षा: 02 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.