---Advertisement---

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर आपण का करू शकत नाही? हा प्रश्न मनाशी बाळगून त्याने एमपीएससीच्या स्वप्नासाठी धडपड सुरू केली. रणजित रणनवरे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातला रहिवासी.

त्याचे वडील युवराजराव रणनवरे पूर्वी दूध डेअरीत कामाला होते. तर आईने घर सांभाळून शेतमजुरीला जायची. त्यांच्या वाट्याला अवघी दोन एकर जमीन… त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करावी लागत असे. पण थोडी परिस्थिती काळानंतर बरी झाली…त्याचे वडील ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून कामाला लागले पण कष्ट काही कमी झाले नाही….पंचक्रोशीतल्या जवळच्या गावात गाडीवरून फिरून लहानसहान व्यावसायिकांकडून पैसे गोळा करून पतसंस्थेत जमा करणं, हेचं त्यांचं काम.

पण त्यांनी मुलांना उच्च शिक्षित केले. रणजित चौथीपर्यंत गावातल्याच झेडपीच्या शाळेत गेला. अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयातून दहावी आणि त्याच ज्युनिअर कॉलेजमधून ८३ टक्क्यांनी बारावी सायन्स पूर्ण केले… नंतर त्याचा नंबर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज ॲग्रिकल्चर कॉलेजला लागला‌. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.या परीक्षांच्या अभ्यासासाठी त्यानं पूर्ण अभ्यासक्रम समजून घेतला. बेसिक विषय पक्के करण्यासाठी शालेय पुस्तकांऐवजी संदर्भ पुस्तकांमधला विषयांचा मूळ गाभा (कोअर) तेवढा समजावून घेतला.

२०११ पासून पुढील सर्व जुन्या प्रश्नपत्रिका आयोगाची प्रश्नांवर भर दिला. भरपूर सराव करताना झालेल्या चूका वारंवार दुरुस्त करत करत सेल्फ स्टडी करूनच पुढं जात राहिला२०२० मध्ये संयुक्त परीक्षेसाठी अर्ज केला….त्यात कोरोना काळ, लिग्यॅमंट डाव्या पायाची दुखणी ह्या अडचणी चालूच होत्या….यातूनच त्याने प्रयत्नात सातत्य ठेवले. मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. तो अभ्यासात देखील एकाग्रतेने अभ्यास करत असे. त्यामुळेच त्याला हे यश मिळाले.पहिल्या प्रयत्नात त्याने पीएसआय हे पद मिळावले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts