---Advertisement---

बीडचा ऊसतोड मजुराच्या मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक; गावाचा ठरला नवा अभिमान !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : गावचे वातावरण, आर्थिक परिस्थिती बेताची यात शिक्षण सुरू ठेवायचे का नाही असा प्रश्न आकाश पाराजी काळे समोर उभा राहिला. पण आपली जिद्द आणि मेहनत करायची प्रामाणिक तयारी असेल‌ तर यश हे मिळतेच. याच जाणिवेतून तो आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचला. अखेर ऊसतोड मजुराचा मुलगा आता पोलीस उपनिरीक्षक झाला.‌‌ ही आकाशची यथोगाथा अनेक तरूणांना दिशादर्शक ठरणारी आहे.

बीड तालुक्यातील वांगी येथे राहणारा आकाश काळे हा रहिवासी.आकाशाचे प्राथमिक शिक्षण त्याच्या राहत्या गावी पूर्ण झाले. तर माध्यमिक शिक्षण बीड येथे पूर्ण केले.आकाशाचे वडील पाराजी काळे हे ऊसतोड मजूर आहेत. वर्षातून सहा महिने ऊसतोडणीसाठी भर राज्यात आणि भर जिल्ह्यात जावे लागते. आर्थिक चणचण होती तरी त्याने हार मानली नाही.

---Advertisement---

पुढील उच्च शिक्षणासाठी आकाशने थेट पुणे गाठले. पुणे येथे पदवीचे शिक्षण घेत एका नामांकित फूड विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये फुल टाइम जॉब केला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील सुरू ठेवला.पदवी परीक्षा उत्तीर्ण नसल्याने २०१७ मध्ये या स्पर्धा परीक्षेत अपयश आले. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याने तीन वेळा पीएसआय पदाची परीक्षा दिली. तेव्हा देखील त्याच्या पदरी अपयश आले. आतापर्यंत नोकरी करून शिक्षण पूर्ण केले याच जिद्दीने तो अभ्यास करत राहिला. अखेर, २०२० मध्ये त्याला स्पर्धा परीक्षेत यश आले आणि तो पोलिस उपनिरीक्षक झाला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts