ऊसतोड मजूराचा मुलगा आकाश झाला पीएसआय !
आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर निश्चितच यश मिळते. याचे उदाहरण म्हणजे आकाश काळे.
बीडच्या आकाशाची गोष्ट ही अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.आकाशाची घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याचे वडील पाराजी काळे हे ऊसतोड मजूर आहेत. ऊसतोड मजूर म्हटलं की स्थलांतर हे आलेत…
एका वर्षातून सहा महिने ऊसतोडणीसाठी एका राज्यात तर कधी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते. त्यामुळे आकाश समोर आर्थिक संकट उभा राहिले. मात्र त्याने हार मानली नाही.आकाशाचे प्राथमिक शिक्षण त्याच्या राहत्या गावी पूर्ण झाले.
तर माध्यमिक शिक्षण त्याने बीड येथे पूर्ण केले.पुढील उच्च शिक्षणासाठी आकाशने थेट पुणे गाठले. पुणे येथे पदवीचे शिक्षण घेत एका नामांकित फूड विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये फुल टाइम जॉब केला. तेव्हाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील सुरू ठेवला.त्याने पुणे येथे मी नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. आपली परिस्थिती आडवी येत असल्याने शिक्षण सुरू ठेवायचे का नाही असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. गावातील नव्याने अधिकारी झालेल्या एका मित्राने त्याला योग्य मार्गदर्शन केलं.पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याने तीन वेळा पीएसआय पदाची परीक्षा दिली.
तेव्हा देखील त्याच्या पदरी अपयश आले.मात्र २०२० परीक्षा दिल्यानंतर तो पीएसआय पदासाठी पात्र झाला. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ते आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचतात. हे आकाशने करून दाखवले आहे.आकाश पाराजी काळे हा ऊसतोड मजुराचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला हे अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.