⁠  ⁠

घरची परिस्थिती अत्यंत बेताची, अहोरात्र मेहनत घेऊन अक्षय झाला पोलिस उपनिरीक्षक!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC PSI Success Story आई वडिलांनी त्याच्यासाठी लहानपणापासून घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने पाहिले.ते त्यांनी ते सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. ही गोष्ट आहे. श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपूत्र अक्षय महादेव महाडिक या होतकरू मुलाची.

अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगाव येथे झाले. सातवी मध्ये असताना राज्याच्या गुणवत्ता यादीत तो चमकला होता. हे करण्यासाठी त्याला त्याचे गुरू प्रवीण ठुबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांचा आदर्श समोर ठेवून त्याला प्रेरणा मिळाली आणि अक्षयने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. एका छोट्याश्या गावात राहून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अभ्यास करायचा. फक्त वाचन करायचा नाहीतर विविध प्रश्नांचा सराव देखील करायचा.

त्यामुळे, त्याची राज्य उत्पादन शुल्क विभागात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

एका छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने गावाने पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली.

Share This Article