PSI Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की सातत्याने अभ्यास आणि यश – अपयशासोबत हिंमतीने लढण्याची तयारी तर हवीच. ज्ञानेश्वर पांडुरंग सानप हा नाशिक जिल्ह्यातील कणकोरी तालुका सिन्नर येथील रहिवासी आहे. त्याने तब्बल सलग वीस वेळा विविध स्पर्धा परीक्षा देऊनही अपयश आले तरी तो खचला नाही, नैराश्यात गेला नाही, कुठल्याही परिस्थितीत सरकारी अधिकारी व्हायचचं या जिद्दीने पेटलेल्या ज्ञानेश्वरला अखेर सरकारी नोकरी मिळाली.ज्ञानेश्वर सानप आता पोलिस उपनिरीक्षक बनला आहे.
घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, आसपासचे वातावरण तसे दुष्काळग्रस्त, आर्थिक चणचण असल्याने घरच्या कोरडवाहू शेतातील कामे करत त्याने स्पर्धा परिक्षाचा अभ्यास सुरु करण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वरचे शालेय शिक्षण मत्हळ बुद्रूक येथे घेतले. त्यानंतर दोडीला येथे बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन अहमदनगर येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.परंतू गेल्या नऊ वर्षांपासून शेतीतच रमला होता.
त्याची मंदा सानप कोरडवाहू शेतात मजुरी करतात, भाऊ वाळूच्या गाडीवर कामावर जायचा, अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अडचणी यायच्या. त्यामुळे मेहनत करूनही काही ना काही कारणाने स्पर्धा परीक्षेत त्याला एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल वीस वेळा अपयश आले. मात्र २१ व्या प्रयत्नात तो पोलिस उपनिरीक्षक झाला. याने सहा वेळा पोलिस उपनिरीक्षक, कक्ष अधिकारी, क्लार्क या परीक्षा तीन वेळा, रेल्वे चार वेळा अश्या वीस वेळा सर्व परिक्षा दिल्या, प्रत्येक वेळी त्याला यशाने हुलकावणी दिली.
जेव्हा ज्ञानेश्वर इंजिनिअर झाला. त्याने जेमलं तरी नोकरी करावी असं वाटतं होतं. पण त्याची इच्छा नव्हती. तो एकाच निर्णयावर ठाम राहिल्याने त्याच्या मित्राने साथ दिली. ज्ञानेश्वरने स्वतः इच्छेने फौजदार झाला. तो त्या गावातला पहिला इंजिनिअरिंग आणि पहिला सरकारी अधिकारी ठरला आहे. मित्रांनो, चांगल्या मित्रांची संगत अन अभ्यासात सातत्याने सराव ठेवल्यामुळे यश गाठता येतं. ते यश मिळवताना कठोर सत्वपरीक्षेला सामोरं जावं लागतं पण मनाशी जिद्द ही हवीच.