MPSC Success Story : डोंगराळ भागातील जडणघडण… आर्थिक परिस्थिती बेताची पण जिद्द मात्र कौतुकास्पद…आग्रेवाडीच्या काजल मच्छिंद्र आग्रे हिची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
काजलचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, म्हैसगाव येथे केदारेश्वर विद्यालयात माध्यमिक शिक्षण, सात्रळ येथे कडू पाटील विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण व प्रवरानगर येथे पद्मश्री विखे महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले.तिचे वडील मच्छिंद्र शिवराम आग्रे यांनी अनेक वर्षे दुसऱ्याच्या टेम्पोवर चालक म्हणून काम केले. आता ते स्वतःचा टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पण लेकीला कायम पाठिंबा दिला. त्यानंतर तिने ठरवले की आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात आहे. म्हणून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
दररोजचे वाचन व लेखन यासोबतच तिने मैदानी सराव देखील केला. सन २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.दुर्गम डोंगराळ भागातील पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या टेम्पोचालकाची मुलगी झाल्याने आग्रेवाडी ग्रामस्थांनी तिची गावातून भव्य मिरवणूक काढली गेली.