MPSC PSI Success Story अत्यंत सामान्य घरात जन्माला आलेला, घरची परिस्थिती बेताची, जराही शेती नाही की धन दौलत नाही, पण अधिकारी होण्यासाठी ध्यास आणि मेहनत मात्र आहे. याच हिंमतीवर जैद पोलिस उपनिरीक्षक झाला.
जैद हा साताऱ्यातील भुईंज येथे राहणारा मुलगा. त्याचे वडील गावोगावी आठवडी बाजारात स्टेशनरी व कटलरी सामान विकतात. सलीम भाई यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणाच्या बाबतीत नेहमीच पाठिंबा दिला. नुसता पाठिंबा दिला नाही तर उच्च शिक्षित केले.
त्यांचा मोठा मुलगा अभियांत्रिकी पदवी मिळवून चांगल्या नोकरीला आहे. तर हा लहान मुलगा जैद मोमीन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथून पूर्ण केल्यानंतर घरीच अभ्यास करत होता. दिवसभर घरच्यांना मदत करत आणि रात्री अभ्यासासाठी बसून त्यांनी हे पद मिळवले आहे. तसेच,
कोणतेही क्लास न करता घरीच अभ्यास करुन जैदने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.