---Advertisement---

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीची गगनभरारी; काजल झाली PSI !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : गावची जडणघडण….अल्पभूधारक शेतकऱ्याच्या नशिबी असणारे अठराविश्व दारिद्र्य…काजलची शिक्षण घेण्यासाठीची धडपड…हे बघून राजकुमार नामदे यांनी आपल्या सर्व अडचणी बाजूला ठेवत काजलच्या पाठीशी खंबीरपणे साथ दिली होती. मुलीची शिक्षणाची जिद्द व चिकाटी लहानपणापासूनच होती, त्यामुळे घरच्या अडचणी बाजूला ठेवून राजकुमार नामदे यांनी मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.

काजल ही मूळात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटकुल या छोट्याशा गावात एका अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी.काजल हिचे माध्यमिक शिक्षण गावातील शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात झाले. पुढे काजलने बीएस्सी कृषी शाखेतून पदवीधर शिक्षण घेतले.. पुणे येथील शासकीय महाविद्यालयातून बीएससी ऍग्री शाखेत ८३ टक्के गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण झाली. कृषी क्षेत्रातील बीएससी ऍग्री ही पदवी तिने संपादन केली.

अभ्यास करण्याची जिद्द, सेल्फ स्टडीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. काजलने या सर्व परिस्थितीची जाणीव ठेवून वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची चीज करत यश संपादन केले.इतकेच नाही तर ती पहिल्याच प्रयत्नात ती एमपीएससीची पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts