---Advertisement---

आई-वडिलांचे स्वप्न झाले साकार ; कुंकू-करदोडे विकणाऱ्या कुटुंबातील किशोर झाला पीएसआय !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीत देखील स्वप्न साकार करायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी उराशी हवीच. नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक व्यवसाय करून बंडू सादुलवार दाम्पत्याने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट केले. एक मुलगा भारतीय वायुदलात, दुसरा मुलगा सीए, तिसरा मुलगा किशोर एमपीएससी परीक्षा पास झाला. साधारण तीसवर्षांपासून बंडू सादुलवार यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुंकू, करदोडे, कटलरी सामग्री डोक्यावर घेऊन पारंपरिक व्यवसाय करतात.

त्यानुसार त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अहोरात्र मेहनत देखील घेतली.किशोर देखील घरच्यांना हातभार लावण्यासाठी गाड्यावर बसायचा. आई-वडिलांनी देखील काबाडकष्ट करुन किशोरचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. त्याची अधिकारी होण्याची इच्छा होती.२०२१ साली त्यानं पीएसआयची परीक्षा दिली.

या परिक्षेत त्यानं यश मिळवत पोलिस उपनिरीक्षकपदी मजल मारली. पोलीस सेवेचे कर्तव्य बजावत उच्च पदस्थ अधिकारी होण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन किशोर नेहमीच मार्गदर्शक असणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts