⁠  ⁠

वडिलांची इच्छा लेकीने केली पूर्ण ; माधुरी बनली पोलिस उपनिरीक्षक

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story आपले आई – वडील हे मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. माधुरीच्या वडिलांची इच्छा होती की लेकीने पोलीस व्हावे. ते स्वप्न माधुरीने पूर्ण केले. पण हे एवढे मोठे यश बघायला ते हयात नाहीत. याची तिला पोकळी जाणवते. अमळनेर तालुक्यातील वासरे या छोट्या गावात लहानाची मोठी झालेली माधुरी पाटील. तिने प्राथमिक शिक्षण गावच्या शाळेत घेतले. पण पुढील शिक्षण व सुखसोयी गावात उपलब्ध नसल्याने माध्यामिक शिक्षणासाठी तिला पायपीट करावी‌ लागली.

तिने दररोज आठ किलोमीटर पायपीट करीत कळमसरे येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले.पुढील उच्च शिक्षण प्रताप महाविद्यालय येथे पूर्ण केले.‌ माधुरीने कायद्याची रखवालदार व्हावी, शेतकरी वडिलांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र मागील वर्षी मध्य प्रदेशातून सालदार गडीला आणताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. पण हे वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी तिने ध्यास घेतला‌. ती दररोज नित्यनेमाने वाचन व लेखन करून लागली. मागील वर्षी झालेल्या सर्व प्रश्नांचा सराव केला. इतकेच नाहीतर मैदानी सराव करण्यासाठी देखील भर दिला. हे नक्कीच सोपे नव्हते.

कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन नसताना सर्व पायऱ्या पूर्ण करणे ही अवघड बाब होती. पण माधुरीने करून दाखवली. या तिच्या सर्व कष्टाचे चीज झाले.या शेतकऱ्याची कन्येची एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने ग्रामस्थांनी गावात सवाद्य चारचाकी वाहनावर मिरवणूक काढण्यात आली.

Share This Article