लेकीची कमाल ! मुलीच्या शिक्षणासाठी आईने धुणीभांडी केली आणि मनाली बनली PSI अधिकारी….
MPSC PSI Success Story : खरंतर कधीकधी आपली परिस्थिती हीच आपली ताकद असते. त्यामुळे, कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षण पूर्ण करत स्वप्नांपर्यंत झेप घेण्याचा प्रवास हा अनेक गोष्टींसाठी बळ देतो.मनाली शिंदे ही कोल्हापूरातील शिवाजी पेठेतील काळकाई या ठिकाणी राहते.मनालीची घरची परिस्थिती बेताची होती. तिचे संपूर्ण बालपण हे आजीकडे गेले. छोटी खोली आणि बिकट परिस्थिती…तिची आई चार घरातील धुणी-भांडी करते.
पण लेकीला वेळोवेळी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. मनालीनेदेखील पार्ट टाइम जॉब केला.ती वडिलांशिवाय वाढली आहे. आईचे दुःख कमी करायचे ही एकच गोष्ट मनात ठेवून मनालीने जिद्द आणि चिकाटीने तिने ध्यास घेतला.वेळप्रसंगी, तिने देखील अभ्यासासोबतच पार्ट टाइम जॉब केली.पोलिस भरतीतील विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिले. या सोबतच आपला अहोरात्र अभ्यास सुरू ठेवला. यादरम्यान तिने विविध सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षा दिल्या. मनालीला २०२१-२२ च्या परीक्षेत अवघ्या १-२ गुणांनी अपयश मिळाले. परंतू, मनालीने हार मानली नाही.
मनाली ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने अशा सर्व परिस्थितीतून तिने यावर देखील मार्ग काढला. सतत अभ्यासाचा ध्यास घेत राहिली. म्हणूनच, या तिच्या मेहनतीला फळ मिळाले.मनाली शिंदेने परिस्थितीशी दोन हात करत PSI बरोबरच नगर परिषद लेखाधिकारी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आयुष्यात मेहनत करायची तयारी असेल तर आपण काहीही करु शकतो,याचे हे उत्तम उदाहरण.