MPSC Success Story : लहानशा गावात जडणघडण झाली आहे तरी मोसमीने जिद्दीने करून दाखवले आहे. मोसमी मोरेश्वर कटरे ही कातुर्ली या गावची मुलगी. तिची आई शिक्षिका आहे. तर आजोबा सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तिचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झाले. घरी अभ्यासाचे वातावरण असल्याने तिला वेळोवेळी आजोबा व आई – बाबाचे मार्गदर्शन लाभले.
तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी गोंदियाला गेली. प्रथम बी.एड प्रशिक्षण करून पुढील शिक्षण घेण्यासाठी आईच्या मार्गदर्शनात एमपीएससीच्या पूर्वतयारीसाठी पुणे येथे गेली.तिने २०१६ ला विविध पदाच्या दोन परीक्षा पास केल्या. मात्र तिने हे पद नाकारले. वर्दीचे आकर्षण असल्याने तिने २०१७ ला पीएसआय पदाची जाहिरात प्रकाशित झाली. २०२० ला तिने नाशिक येथे पीएसआय या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. २०२१ या वर्षी ७ एप्रिलला नागपूर शहर येथे आपल्या पदावर रुजू झाली आहे.
एका लहानशा गावातील मुुलीने, जिद्द व चिकाटीने आज ती युवती पोलीस उपनिरीक्षक झाली आहे.आमगाव तालुक्यातील कातुर्ली येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले आहे..