MPSC PSI Success Story : परमेश्वरचे आई – वडील हे ऊसतोड कामगार, घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरी देखील त्याने भरपूर शिकून शिकण्याची कास धरायचे ठरवले. आष्टी तालुक्यातील खरकटवाडी येथे राहणारा परमेश्वर महादेव तांदळे. प्राथमिक शिक्षण गावात व अहमदनगर जिल्ह्यातील बारदरी येथील आश्रमशाळेत तर माध्यमिक शिक्षण हे देवळाली येथील सरस्वती विद्यालयात आणि उच्चशिक्षण लोणी प्रवरा येथे झाले.
त्यांनी पदवी शिक्षण झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने अहमदनगर गाठले. त्याने ठरवले की अधिकारी झाल्यावरच घरी परत यायचे. ही जिद्द त्याला दिवसरात्र अभ्यास करण्यासाठी भाग पाडत होती. त्याला या शिक्षणासाठी आणि तयारीसाठी आई, वडील आणि मोठ्या भावाने खूप साथ दिली. २०१८ मध्ये त्याने पहिल्यांदा परीक्षा दिली.
तेव्हा तो सहा गुणांनी अपयशी ठरला. त्याने निश्चय केला की आपण दररोज आता अभ्यास वाढवायचा, अजून कष्ट द्यायचे निराश व्हायचे नाही. जोपर्यंत अधिकारी होत नाही तोपर्यंत घरी येणार नाही, हे त्यांनी घरच्यांना पण सांगितले होते. अखेर, या संपूर्ण मेहनतीला फळ मिळाले.२०२२ ला परीक्षा दिली. पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याचे साऱ्या कुटुंबाला आणि गावाचा आनंद गगनात मावेनासा झाला.