MPSC Success Story : घरची परिस्थिती बेताची असली तरी जिद्द मोठी असली पाहिजे.आप्पासाहेब इनकर व त्यांचे कुटुंबांनी बिकट परिस्थितीत देखील मुलींना उच्च शिक्षण दिले. हे सगळ्यांच्या पुढे आदर्श आहे. राधाने देखील परिस्थितीची जाणीव ठेवली आणि मेहनत घेतली. शिरूर तालुक्यातील खोकरमोहा या गावची राधा इनकर ही रहिवासी. आप्पासाहेबांच्या कुटुंबामध्ये चार मुली व एक मुलगा असा परिवार. मोठी मुलगी राणी यांची जेव्हा वनरक्षक म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने मिळाले. तसे पाहायला गेले तर त्यांच्या थोरल्या मुलीला म्हणजेच राणीला देखील अधिकारी व्हायचे होते.
परंतू परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण आपल्या लहान बहिणीला अधिकारी बनवायचे हे मोठ्या बहिणीने मनाशी ठरवले व राधा यांना त्यांच्या थोरल्या बहीण राणी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व सगळ्या गोष्टींची मदत केली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राधा या जेव्हा सातवी, नववी आणि अकरावी मध्ये होत्या तेव्हा त्यांच्या आई आजारी पडल्या.या कालावधीमध्ये वडिलांना मदत म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम देखील केले. कष्टाचे फळ त्यांना त्यांची या ऊसतोड कालावधीमध्ये तीन वेळा त्यांना शाळेतून नाव देखील काढावे लागले.
या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पुढे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी केली..राधाला स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी याकरिता बार्टी या संस्थेने सर्व पुस्तके पुरवली. तसेच मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांच्या वडिलांनी राधाच्या शिक्षणाकरिता कर्ज काढले. पण तिला अधिकारी होण्यासाठी संपूर्ण पाठिंबा दिला.तसेच फौजदार साठी आवश्यक मैदानी चाचणीसाठी लागणारे आवश्यक शूज देखील त्यांनी घेऊन दिले.
संपूर्ण कुटुंबाचा आधार आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व कष्ट आणि सातत्य यामुळे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राधा उत्तीर्ण झाली व आता त्यांची फौजदारपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे राधा या शिरूर तालुक्यातील तिसरी पोलीस अधिकारी म्हणून नावारूपाला आले आहेत.