MPSC PSI Success Story सचिनचे बालपण लहान कुटूंबात झाले. एक भाऊ,एक बहीण असे तिघे भावंडे व आई व वडिल असे छोटेसे कुटुंब. त्याचे वडील रेल्वेत कामाला होते. तर आई शेतीची कामे करत असायची. त्यावरच कुटुंबाचा आर्थिक गाडा चालत असायचा.आपल्याला शिक्षण घेता आले नाही.आपण निरक्षर असल्याने, आपल्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे. आपल्यावर जी वेळ आली ती मुलांवर येऊ नये. अशी खंत आईवडिलांना सतत वाटत असे. सचिनला देखील सरकारी अधिकारी व्हावे, ही घरांची देखील इच्छा होते. त्यानुसार, तसा सचिनने देखील अभ्यास केला.
सचिनचे प्राथमिक शिक्षण विठ्ठलवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण गावातीलच संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय मध्ये झाले. सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार पक्का केला. बारामती येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. येथील महाविद्यालयाच्या वातावरणात स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती मिळाली. अधिकारी होण्याचा पक्का निर्धार केला.
पण, अभियांत्रिकीचे शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या कॅम्पसमधून एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधीदेखील निर्माण झाली. परंतु अधिकारी होण्याचे स्वप्न अधिक बळकट होऊ लागले होते. अभियांत्रिकीची पदवी हातात असल्याने, नोकरी तर कधीही मिळणार याची शाश्वती होती. त्यामुळे आई-वडिलांची परवानगी घेऊन स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. पण,स्पर्धा परीक्षा करण्यापुर्वीच ‘प्लॅन बी’ देखील ठरवला होता.
जिद्द चिकाटीने अभ्यास जोमात सुरू केला. अभ्यासाच्या जोरावर यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली, परंतू अंतिम यादीत नाव आले नाही. अशीच दोन तीन वर्ष मुख्य परीक्षा, मुलाखतीपर्यंत निवड होत असायची परंतू अंतिम यादीत अपयशास सामोरे जावे लागत असायचे. त्यानुसार यूपीएससी बरोबरच एमपीएससी देखील करण्याचा निर्णय घेतला. त्यात यश आले. सचिनला पोलिस उपअधिक्षक हे पद मिळाले. खऱ्या अर्थाने त्यांच्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज झाले.
स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
फेसबुक पेज : Mission MPSC | टेलिग्राम चॅनल : @MissionMPSC