MPSC PSI Success Story मूळ ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करायला लागतो. या अडचणी आल्यातरी त्यामध्ये खचून न जाता ध्येयाने झपाटलेपणाने अभ्यास करून यश गाठता येते.विटा तालुका खानापूर ह्या गावची सुनबाई अतिशय कष्ट मेहनत घेऊन पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. त्यांचा पोलीस उपनिरीक्षक हा काळ आणि प्रवास प्रचंड संघर्षमय होता.
प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, माध्यमिक शिक्षण पूर्ण करून, या स्नेहल वरुडे यांनी विटा येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होत असतानाच त्यांचे लग्न सुशांत वरुडे यांच्याशी झाले. पण त्यांना त्यांचे मन एक अधिकारी या पोस्टसाठी खुणावत होते. त्यांनी जिद्द सोडली नाही. प्रयत्न करत राहिले अभ्यास करत राहिल्या,त्यांनी पोलीस उपनिरीक्षक या पदाने गवसणी घातली. घरातून मिळालेले पाठबळ, व पतीची मोठी साथ या जोरावर त्या पदावर पोहोचल्या आहेत.
त्यांना लहानपणापासून पोलिस क्षेत्राची आवड होती, आपल्या अंगावर वर्दी असावी हे स्वप्न होते. त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली एमपीएससीचा रिझल्ट लागला आणि या राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.खरंतर त्या एका सर्वसामान्य घरातील मुलगी. त्यांचे वडील मुंबईला व्यापारी मात्र व्यापारातील मंदीमुळे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गावी मायणी ता. खटाव जि. सातारा येथे यावे लागले. बीएस्सी झाल्यानंतर एमपीएससी कर असे माझ्या मोठ्या बहिणीने सुचविले. पण ही गोष्ट एवढी सोपी नाही हे त्यांना माहिती होते. कारण, त्या ज्या ठिकाणी रहात होत्या त्याठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यांच्या चार भावंडांचा उदरनिर्वाह, शिक्षण कसेबसे शेतीवर सुरू होते. त्यांना बीएस्सीला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये मता ८०% मिळाले. एमएस्सीला ॲडमिशन घेतलं मात्र त्याचवेळी स्नेहल यांचे लग्नही झाले होते. त्यानंतर दुसऱ्या लढ्याला सुरुवात झाली. कारण, त्यांच्या सासूबाईना कॅन्सरचा आजार होता. त्यामुळे घराची जबाबदारी वाढलेली होती. अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण होणार की नाही याची त्यांना धास्ती होती.
स्वतःला शिक्षण घेता आले नाही पण सुनेने शिकावं अशी अपेक्षा बाळगून होत्या, त्यांनी यांना शिक्षण सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी मुलाकडे व संसाराकडे लक्ष देत एमपीएसीचा अभ्यास केला. त्या किचनमधील काम करत पाठांतर करायचे, खूप अभ्यास करायचे. मात्र तरीही पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास झाली नाही. तर पीएसआय दोन वेळा अगदी तीन तीन माकांनी हुकले. त्यानंतर त्यांनी अभ्यासाचे वेळापत्रक बदलले. अभ्यासाचे शेड्यूल ठरवले. रोजच्या कामाबरोबरच अभ्यासाचे वेळापत्रक केले. आणखी रात्रंदिवस जोमाने अभ्यास केला. एमपीएससी मुख्य परिक्षा पास झाले. त्यांनी मुलाखतीमध्येही आत्मविश्वासाने उत्तरे दिली. मुलाखत झाली. सहा महिन्यांनी निकाल आला. अखेर, स्नेहल पी.एस.आय झाल्या.