⁠
Inspirational

कमी वयात लग्न झालं पण स्वतः काहीतरी केले पाहिजे हा निश्चयाने सोनियाने मिळवले PSI पद !

MPSC PSI Success Story : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील सोनिया चंद्रकांत मोकाशे ही शेतकऱ्याची मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने दहावीपर्यंत कसंबसं शिक्षण झालं…नंतर तिच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. पण तरी आर्थिक चणचण ही होतीच.

पण परिस्थिती बदलायची असेल आणि स्वतःला सिद्ध करायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तिने २०१६ ला काहीतरी करायचे या उद्देशाने अकरावीला प्रवेश घेतला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण सुरू केले. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याचबरोबर पोलीस भरतीचीही तयारी सुरू केली. पोलीस कॉन्स्टेबल पेक्षा आपण पीएसआय का होवू नये? असे वाटले आणि त्याचीही तयारी सुरू केली. नऊ वर्षांनंतर खंडित झालेलं शिक्षण सुरू केलं. वयामुळे शारीरिक कुरबुरी सुरू झालेल्या होत्या.

तिला मैदानी सराव करत असतांना पायांना प्रचंड वेदना व्हायच्या मात्र तरीही सराव सुरू ठेवला. तिचे पदवीचे शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होता. तिची त्यावेळी आठ वर्षाची मुलगी होती. तिला एकटीला टाकून जाता येत नव्हते. म्हणून तिच्या नणंद शीतल सोळंके हिने मुलीचा सांभाळ केला. त्यामुळे तिला अभ्यासाला पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाले. भाऊ पद्माकर याने शिक्षण सोडून छत्रपती संभाजीनगर येथे खासगी कंपनीत नोकरी करत पैसे पुरवत असे तर वडिलांनी सालगडी म्हणून राहत पैसे पुरवले. तिला खासगी शिकवणी लावणे परवडणारे नव्हते. त्यामुळे सेल्फ स्टडी केली. गंगाखेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी मित्रांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने अभ्यास सुरू ठेवला.स्वतः मधील जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तिचा हा खडतर प्रवास सुकर झाला.

त्यामुळे, कान्हेगाव या गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान सोनियाने मिळवला.

Related Articles

Back to top button