---Advertisement---

वडिल गवंडी कामगार, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पोरगी बनली PSI ! वाचा प्रेरणादायी प्रवास..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : वहिदा ही सांगली जिल्ह्यातील एका छोट्याश्या दूधगाव या खेडेगावातील मुलगी. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती त्यामुळे तिला स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार करण्यासाठी अतिशय खडतर परिश्रम घ्यावे लागले.

वहिदाचे वडिल आयुष्यभर गवंडी काम करतात. सहा जणांचे कुटूंब आणि एकटा कमवता माणूस यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत राहायची. पण वहिदाच्या वडिलांनी चारही मुलांना चांगले शिक्षण दिले. वहिदाने देखील शालेय व महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिकदृष्ट्या चांगली प्रगती करून नावलौकिक केले. तिचे पदवी शिक्षण चालू असताना तिचे लग्न झाले.

पुढे तिला मुलगी देखील झाली. तिचा सांभाळ करत ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. घरात सर्वात लहान असलेला तिचा भाऊ सैन्यात भरती झाल्यावर घरची परिस्थिती थोडी सुधारली, त्यानेच वहिदाला स्पर्धा परीक्षेला बसण्याची प्रेरणा दिली. सुरूवातीला पहिल्या प्रयत्नात तिला एमपीएससीमध्ये अपयश आले पण ती डगमगली नाही.

प्रतिकूल परिस्थितीतला तोंड देत अभ्यास करत राहिली. कधी मैदानात जाऊन दोन – तास सराव करायची तर कधी पुस्तकाचे वाचन करायची. दोघांचा मेळ घातल तिने हे पद मिळवले यांचा संपूर्ण गावाला व सगळ्यांना आनंद झाला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts