महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० पदांच्या २०० जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२१ ०३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या:
१) सहायक राज्यकर आयुक्त – १०
२) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी – ०७
३) सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी – ०१
४) उद्योग उप संचालक, तांत्रिक – ०१
५) सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता – ०२
६) उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा- २५
७) कक्ष अधिकारी – २५
८) सहायक गट विकास अधिकारी- १२
९) सहायक निबंधक सहकारी संस्था- १९
१०) उप अधीक्षिक, भूमी अभिलेख – ०६
११) उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क – ०३
१२) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – ०१
१३) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी -०४
१४) सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम – ११
१५ नायब तहसिलदार – ७३
शैक्षणिक अर्हता :
– उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अर्हता.
– उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ संवर्गासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक : (१) सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी, किंवा (२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी
– अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याकरीता विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यन्त पूर्ण केली असली पाहिजे.
– सर्व संवर्गासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक राहील.
वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी १९ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५४४/- रुपये [मागासवर्गीय – ३४४/- रुपये]
पगार (Pay Scale) : ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर.
परीक्षा दिनांक : ०४, ०५ व ०६ डिसेंबर २०२१ रोजी
परीक्षा पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ सप्टेंबर २०२१ ०३ ऑक्टोबर २०२१
जाहिरात (Notification ) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
निवडप्रकिया :
जाहिरात/ अधिसूचनेमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत/शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
सेवा भरती बाबतची संपूर्ण प्रक्रिया संबंधित संवर्ग/पदाच्या सेवाप्रवेश नियम आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, आरक्षणासंदर्भातील शासनाचे प्रलंबित धोरण तसेच आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
परीक्षेचे टप्पे- दोन
प्रस्तुत मुख्य परीक्षा खालील दोन टप्यामध्ये घेण्यात येईल :
(१) लेखी परीक्षा गुण – ८००
(२) मुलाखत गुण १००
मुख्य परीक्षेस प्रवेश :
राज्य सेवा पूर्व परीक्षा – २०२० च्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्ग/पदाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पुर्तता करणा-या उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.