MPSC पूर्व परीक्षा २०२१ चे प्रवेशपत्र जारी ; असे करा डाऊनलोड
महाराष्ट्र लोकसोवा आयोग (MPSC) ने राज्य सेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांसाठी उपलब्ध केले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक कर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी, उप अधीक्षक आणि अन्य पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा होत आहे.
उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा या वृत्तात पुढे दिलेल्या थेट लिंकवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.
MPSC State Service admit card कसं डाऊनलोड कराल?
– राज्य लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in वर जा.
– होमपेजवरील “MPSC State Service admit card” या पर्यायावर क्लिक करा
– आता नवं पेज उघडेल
– तुमचं MPSC यूजरनेम आणि पासवर्ड टाका.
– आता MPSC State Service admit card स्क्रीनवर दिसेल.
– अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घेऊन ठेवा.
This group is full please provide another group