सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लवकरच लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC द्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. MPSC Steno Bharti 2022-23
त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत.
लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र राजपत्रित गट व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून प्रस्तावित असून, त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडयात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परिपूर्ण मागणीपत्र सादर करावे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एमपीएससीद्वारे दरवर्षी मोठी पदभरती आयोजित केली जाते. त्यानुसार एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदासाठी खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया पदे महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा राबविण्यात येत होती. मात्र स्पर्धा परीक्षार्थीनी संबंधित भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबविण्याची मागणी केली होती. आता ही भरतीप्रक्रिया MPSC मार्फतच राबविली जाणार आहे.
.. तर पदभरती नाही
१५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त न झाल्यास सन २०२३ मध्ये संबंधित विभागाची पदे भरायची नाहीत, असे समजण्यात येईल. तसेच स्पर्धा परीक्षांच्या सन २०२३ च्या अंदाजित वेळापत्रकामध्ये संबंधित विभागातील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार नाही. परिणामी, लिपीक-टंकलेखक भरतीसाठी सन २०२३ मध्ये आयोगास भरती प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही, असेदेखील आयोगाने स्पष्ट केले आहे.
या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क पदाच्या एकूण 1077 जागा रिक्त होत्या. त्यामुळे आता किती जागांसाठी ही भरतीप्रक्रिया होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.