---Advertisement---

आदिवासी – शेतकरी कुटुंबातील लेकीची किमया न्यारी; जिद्दी अन् चिकाटीने बनली अधिकारी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं की आपल्या मुलांनी सरकारी नोकरीत लागावं आणि देशाची सेवा करावी आपल्या मनात जर देशाची सेवा करण्याची इच्छा असेल लोकांची सेवा करायची लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सेवा हा उत्तम पर्याय आहे. ह्याच भावनेने आरतीने देखील खूप अभ्यास केला आणि हे पद मिळवले आहे. उमरखेड तालुक्यातील धनंज या छोट्याशा खेड्यातील रहिवासी आरती डिगाबंर साबळे या तरुणीची ही यशोगाथा….

धनज या छोट्याशा खेड्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, तर जवाहरलाल नवोदय विद्यालय घाटंजी यवतमाळ येथे माध्यमिक ,तर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती येथील पदवीचे शिक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ग दोनच्या तालुका कृषी अधिकारी पदापर्यंत आरतीने झेप घेतली. गावात कोणत्याही सुविधा नसताना आरतीने अत्यंत चिकाटीने आपले ध्येय पूर्ण केले.

तिला पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेत अपयश आले. परंतू ध्येय गाठण्याच्या जिद्दीमुळे आरतीने अखेर महाराष्ट्र कृषी सेवा आयोगाच्या 2022 च्या अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून चौथी रँक मिळवली आहे. कृषी अधिकारी पदी निवड झालेली आरती डिगाबंर साबळे ह्या या पदी पोहोचलेल्या गावातून एकमेव उमेदवार आहेत.

ती मूळात शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक हितोपयोगी कार्य करण्याचा आरतीचा मानस आहे. तिच्यासाठी आई – वडील हे सगळ्यात मोठे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी तिला प्रत्येक प्रयत्नात आणि पदोपदी मोलाची साथ दिली आहे. हे सरकारी अधिकारी पद मिळून आई – वडिलांच्या कष्टाचे चीज झाले असे म्हणायला हरकत नाही.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts