---Advertisement---

भंगार आणि रांगोळी विक्रेत्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार ; वाचा त्याच्या जिद्दीची यशोगाथा…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आपल्या उराशी जिद्द आणि चिकाटी असेल तर दारिद्र्यलाही झुकावं लागतं, हेच अक्षय तिवासा यांनी दाखवून दिले आहे. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगलं, हे स्वप्न त्याने वयाच्या पंचविसाव्या वर्षी सत्यात उतरवलं आहे.

वाचा त्याच्या जिद्दीची यशोगाथा…
अक्षय गडलिंग हा तिवसा येथील रहिवासी. त्याचं ठिकाणी त्याचे शिक्षण देखील झाले.दुर्गम भागातील असणाऱ्या अक्षयला कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या की आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.त्यामुळे, तो शिकवणी वर्ग लावू शकत नव्हता. म्हणून, आपल्या झोपडीत दिवा लावून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. फक्त घराचा रोजच्या रोज अभ्यास व तिवस्यातील राजश्री शाहू महाराज वाचनालयातील अभ्यास करत विजयाला गवसणी घातली.

अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग यांचा गेल्या चाळीस वर्षांपासून भंगार आणि रांगोळी विक्रीचा व्यवसाय आहे.तर आई मोलमजुरी करते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गरिबीची चणचण अक्षयला भासू नये यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही.

वडीलांची मुलाला अधिकारी बनविण्याची धडपड आणि मेहनत डोळ्यासमोर ठेऊन अक्षयने त्याच्या जिद्दीची वात तेवत ठेवली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने याआधी पीएसआय वन विभागाची परीक्षादेखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. तरीही तो खचला नाही. त्याने अभ्यास सतत चालू ठेवला.अक्षय आता नायब तहसिलदार झाला आहे.

मित्रांनो, कुटुंबाची गरीब परिस्थिती असली तरी खडतर मार्गातून मेहनतीच्या जोरावर यश हे मिळतेच.त्यामुळे, मेहनत घेत रहा, यश नक्कीच मिळेल.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts