MPSC Success Story : आपल्याला देखील आयुष्यात काही तरी करून दाखवायचे आहे. या उद्देशाने अक्षयने देखील स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि यश संपादन केले. अक्षय ईश्वर काळे हा मूळचा करमाळा तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी. तर हल्ली तो आपल्या कुटुंबासमवेत बार्शी येथील सुर्डी या गावी राहत आहे.
अक्षयचे आजोबा मच्छिंद्र काळे हे ग्रामसेवक होते. त्यांनी गावासाठी बरीच चांगली कामे केली आहेत.अक्षयचे कोविड काळात आजोबा वारले. पण त्याने खचून न जाता अभ्यास चालूच ठेवला. अक्षयचे वडील ईश्वर हे प्रिन्सिपल ऑपरेटर म्हणून माढा येथील महावितरणमध्ये कार्यरत आहेत. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय यांनी आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. बार्शी, करमाळा, सोलापूर, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपला आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अक्षयने २०१७ मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी सुरुवात केली.
या प्रवासाच्या दरम्यान त्याला काहीच गुणांनी अपयश येत होते. त्यामुळे त्याने होणाऱ्या चूका सुधारल्या आणि नव्या उमेदीने पुन्हा परीक्षा दिली. कधी मुख्य परीक्षेपर्यंत जायचा मग अपयश यायचे. परत, अभ्यासाला सुरुवात करायचा असे सगळे चालू असताना देखील त्याने अभ्यास चालू ठेवला.
अक्षय ईश्वर काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण केली. मग सरळ सेवेची प्रशासकीय परीक्षा देखील उत्तीर्ण केली.हे पास झालेल्या गोष्टीला आठवडा होत नाही, तोपर्यंत मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षेचा निकाल लागला व त्यात महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान अक्षय यांनी मिळवला आहे. या संपूर्ण प्रवासात त्याने जराही जिद्द सोडली नाही व अभ्यास सुरु ठेवला. त्यामुळे तो राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तो आता याच पदावर न थांबता यापेक्षा मोठे पद मिळवण्यासाठी अभ्यास सुरु ठेवणार आहे.