जेव्हा ग्रामीण भागातील मुले तेव्हा सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट ठरते. आपल्या ग्रामीण भागातील मुले देखील उंच भरारी घेऊ शकतात हे अक्षयने दाखवून दिले. शेतकरी व विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष संजय पगार यांचा तो मुलगा आहे.हे नांदगाव तालुक्यातील कळमदरी येथील अक्षय पगार सिद्ध करून दाखविले आहे.
लहानपणापासून शेतकरी जीवन अनुभवलेल्या पगार कुटुंबीयांनी अक्षयला शिक्षणासाठी नेहमी प्रेरणा दिली.लहानपणापासून सैन्यदलात किंवा प्रशासनात येऊन देशसेवेचे स्वप्न होते.अक्षयचे प्राथमिक शिक्षण कळमदरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण साकोरा येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात झाले. केटीएचएम महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सिंहगड कॉलेज येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच अक्षय स्पर्धा परीक्षेकडे वळला.
मनात जिद्द व चिकाटी असली तर माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नसल्याने त्याने अधिक अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. या अभ्यासाच्या बळावर त्याने मागील वर्षी पहिल्याच प्रयत्नात अक्षयने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगांतर्गत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अक्षयने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (वर्ग एक) पदाला गवसणी घातली आहे.