प्रत्येकाने स्वप्न बघावे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत देखील घ्यावी. अस्मिता मच्छिंद्र केकाण ही एक शेतकऱ्याची लेक. दौंड तालुक्यातील पाटस या गावातील लेक. तिने आपल्या पोलिस अधिकारी असलेल्या मामाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अस्मिताने पोलिस अधिकारी बनण्याचे ध्येय निश्चित केले होते.
मामाच्या अंगावरील पोलिस वर्दी, रुबाब ती प्रतिष्ठा पाहून तिच्या मनात फौजदार होण्याची इच्छा निर्माण झाली. तिने स्वप्न बाळगून त्यानुसार कंबर कसली. ते ध्येय साकार करण्यासाठी तिने मेहनत देखील घेतली. तिचे शालेय शिक्षण हे अस्मिताचे पाटस येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झाले. बारावीपर्यंत कुसेगाव येथील विद्यालयात शिक्षण झाले.
त्यानंतर तिने पुणे येथे कलाशाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतले.२०१६ मध्ये तिने फौजदारपदाची परीक्षा दिली. मात्र, तिला पहिल्या प्रयत्नात अपयश आले. खचून न जाता तिने पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू ठेवले. २०१८ मध्ये तिने पुन्हा अपयश आले.शेवटी २०२२ रोजी तिने पुन्हा फौजदारपदाची परीक्षा दिली. त्या परीक्षेचा नुकताच १ ऑगस्ट २०२४ मध्ये निकाल लागला. अन् अस्मिताची स्वप्नपूर्ती झाली. अस्मिता हिला २७६ मार्क मिळाले. शेतकरी कुटुंबातील मुलीने फौजदारपदाला गवसणी घातली.दांडगी इच्छाशक्ती अन् कर्तृत्वाची साथ असेल तर यशाचं आभाळ कवेत आल्याशिवाय राहत नाही.