---Advertisement---

ऊसतोड कामगारांचा मुलांच्या अंगावर अभिमानाची वर्दी; भाऊसाहेब गोपाळघरेंची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : कोणत्याही परिस्थितीत, सोयीसुविधा नसताना देखील यश मिळते तेव्हा अनेकांना नक्कीच प्रेरणादायी ठरते. जामखेड तालुक्यातील खर्ड्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागोबाची वाडी म्हणजे तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागात नागोबाचीवाडीमध्ये राहणारे भाऊसाहेब गोपाळघरे. बालाघाटाच्या कुशीत असलेल्या नागोबाची वाडी परिसरातील बहुतांश जमीन जिरायती. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने राहायला घरी नाही… एकंदरीत संपूर्ण जिरायती शेती, ऊसतोड कामगार म्हणून मजूरीवर रोजीरोटी चालत असे.

आजही त्याच्या छपराच्या घरातच भाऊसाहेबाचे कुटुंब गुजराण करत आहे. ते इयत्ता पहिलीपासून आश्रमशाळेत शिकले. पहिली ते चौथीचे शिक्षण उंबरे (ता. पंढरपूर) येथे, तर माध्यमिक पाचवी ते नववीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील राजाराम भोसले निवासी आश्रमशाळेत केले. दहावी ते बारावीचे शिक्षण खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूलमध्ये झाले.पुढे बीएस्सी ॲग्रीची पदवी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून सन २०१५ ला मिळवली.

---Advertisement---

त्यानंतर भाऊसाहेब याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास राहुरी विद्यापीठात सुरू केला. या ठिकाणी तब्बल सहा वर्षे भाऊसाहेब याने अभ्यास केला‌. यात देखील त्यांना अपयश आले. पण मेहनतीने अभ्यास करत राहिले. परिस्थिती बदलायची असेल तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, ते अधिक मेहनत घेत असतं. यामुळेच त्यांना यश मिळाले. भाऊसाहेब गोपाळघरे राज्यात १५१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे.हे संपूर्ण त्या़ंच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts