⁠  ⁠

वडिलांचे लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न झाले पूर्ण; लेकाची पोलिस उपअधीक्षक पदी निवड!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आपल्या‌ आई – वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. तसेच भूषण दत्तात्रय माने याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. जिद्दीने पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली.‌भूषण हा सामान्य मध्यमवर्गीय कुटूंबात जडणघडण झालेल्या मुलगा.‌ त्याचे आजी-आजोबा कळकाच्या काड्यांपासून सुप, पाट्या, कणग्या, दुरडी बनवायचे, तर वडील एका बँकेत शिपाई होते. लाल दिव्याच्या गाडीतूनच आला पाहिजेस, असे वडिलांचे स्वप्न होते‌. त्यामुळे त्याने मेहनत देखील घेतली.

प्राथमिक शिक्षणापासून ते सीईटी आणि मुंबईतल्या व्हीजेटीआय मधील अभियांत्रिकी पदवी मिळवेपर्यंत भूषणने आपली उच्च गुणवत्ता कायम राखली होती. त्याच्या या गुणवत्तेमुळे परदेशातील नोकरीची संधी चालून आली होती. मात्र, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व जाणून असलेले भूषणचे चुलते बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे क्रीडा अधिकारी विकास माने यांनी त्याला स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुचवला.

पण आर्थिक परिस्थिती बेताची होती.परिस्थितीतही न डगमगता दत्तात्रय माने यांनी वृत्तपत्र विक्री आणि जोडीला लॉटरी स्टॉलचा व्यवसाय करत भूषणच्या शिक्षणाचा डोंगर पेलला. मुलासाठी कितीही कष्ट उपसावे लागले, तरी चालतील या जिद्दीने पेटलेल्या बापाने प्रसंगी रिक्षाही चालवली.

याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर, वन विभाग, गुप्त वार्ता आणि मुख्याधिकारी या पदाच्या ४ पोस्ट काढण्याचा विक्रम केला. भूषण हा सध्या गडचिरोली येथे मुख्याधिकारीपदी काम करत आहे. या सेवेत असताना त्याने आता बापाने मनात पेरलेले स्वप्न पूर्ण करत पोलिस उपअधीक्षक पद पटकावले आहे.

Share This Article