---Advertisement---

वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाला उच्च शिक्षित केलं ; लेक झाला आरटीओ अधिकारी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : दादासाहेब गाडे यांनी आईवडिलांनी केलेल्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास केला. वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय केला तर भावांनी गवंड्याच्या हाताखाली काम करत कुटुंबाला हातभार लावला. मोलमजुरी करून मुलाला शिकवलेल्या कामाचं चीज झाले. त्याचे संपूर्ण बालपण आणि जडणघडण ही आष्टी तालुक्यातील वटणवाडी निमगावच्या मध्यभागी असलेल्या झोपडपट्टी परिसरात झाले.

त्याच्या वडिलांनी ४० वर्षे भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलांना उच्च शिक्षण दिले. तर आईनी मजूरी करून कुटुंबाचा गाडा चालवला. त्यांच्या मुलांनी देखील या परिस्थितीची जाणीव ठेवली आणि परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. हा विचार मनाशी पक्का केला.दादासाहेब गाडे यांनी पहीली ते दहावी कानिफनाथ विद्यालय निमगाव येथे केले तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीराम जुनियर कॉलेज कडा तर मेकॅनिकल इंजिनिअरचे शिक्षण विखे-पाटील इंजिनिअरिंग कालेज अहमदनगर येथे पूर्ण केले.

आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्याने काही दिवस नारायणगाव येथे एका कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यास केला.पुढे काही दिवस काम करत आहेत. हे करत असतानाच विविध स्पर्धा परीक्षा देणे त्याने सुरूच ठेवले. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्याला यश मिळाले. तो महाराष्ट्रात ६६वा आला तर तर एसटी प्रवर्गातून महाराष्ट्रामध्ये तिसरा येण्याचा मान दादासाहेब गाडे याने मिळवला आहे.

तीन मुलांची शिक्षण कसेबसे करून मोठ्या मुलाला दादासाहेब यास आरटीओ अधिकारी बनवण्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts