MPSC Success Story स्पर्धा परीक्षा म्हटलं की काही गोष्टींसाठी तडजोड ही आलीच. या प्रवासात सातत्याने अभ्यास करणे महत्वाचे आहे. हा जर अभ्यास असेल तर यश हमखास मिळते. अशाच, धांडेवाडी – कर्जत येथील दीपक राजेंद्र धांडे या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केले.
दीपकची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.आई आणि वडील दोघे शेतकरी आहे. अशाही परिस्थितीत
त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याने माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण कर्जतमध्ये घेतल्यानंतर पुढील कृषी पदवीचे शिक्षण शिवाजीनगर पुणे येथे पूर्ण केले. बारावीपर्यंत दीपकने सायकल रिपेरिंगचे काम करीत शिक्षण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१७ पासून दीपक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत परीक्षा देत होता.
या दरम्यान कोरोना संक्रमणातील लॉकडाऊन काळात त्याने मार्केटमध्ये भाजी-पाला विकत आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण केला. शेवटी २०२१ च्या राज्यसेवा परीक्षेत त्याने यश मिळवत महाराष्ट्रात ९६ वा क्रमांक पटकावला.विशेष म्हणजे दीपक याने राज्यसेवा मार्फत झालेल्या मुलाखतीमध्ये सर्वाधिक ७० गुण मिळवले आहेत. सध्या त्यांचे यशदा येथे अधिकारी बनण्याचे ट्रेनिंग चालू आहे.