MPSC Success Story नोकरी हा विषय प्रत्येक तरुण-तरुणीचा जिव्हाळयाचा विषय बनला आहे. मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी उराशी बाळगून आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती घेतली जाते. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. पण काहींना परिस्थितीने एवढं हिम्मतवान बनवलेलं असतं की ते काही केल्या हरत नाहीत. एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोरीनं आपल्या मेहनतीच्या जोरावर MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. MPSC Success Story Dnyaneshwari Tolmare
MPSC च्या राज्यसेवा परीक्षेत लातूर जिल्ह्यातील टाका या गावातील अल्पधूधारक शेतकऱ्याची मुलगी ज्ञानेश्वरी तोळमारे (Dnyaneshwari Tolmare) हिने घवघवीत यश मिळवीत मुलींमध्ये राज्यात पंधरावा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ज्ञानेश्वरीला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. तिचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलीला शिक्षण दिले. ज्ञानेश्वरीचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण टाका येथील शाळेतच झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी दयानंद महाविद्यालय लातूर येथे प्रवेश घेतला व तेथूनच एमपीएससीची आवड जडली. या यशानंतर आई-वडिलांचा पाठीवर कायमच हात होता अशी भावना ज्ञानेश्वरीने व्यक्त केली.
लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. ज्ञानेश्वरीला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. समाजासाठी काहीतरी करावे असे ठरवून अभ्यासाला सुरुवात केली. आमच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी आयुष्य वेचले आहे यामुळे याची उपरती म्हणून मनोभावे प्रयत्न केला व आज राज्यात मुलींमध्ये पंधरावे स्थान मिळाले असे ज्ञानेश्वरी यांनी सांगितले.
कोरोना काळात अभ्यास करते वेळी मार्गदर्शन मिळत नव्हते. त्यामुळे भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. पण सेल्फ स्टडी करून शंकांचे निरसन स्वतःहून करून घेतलं. याचा फायदा झाल्याचं ज्ञानेश्वरी सांगतात. अधिकारी झाल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण मुलींच्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे पद मिळेल त्याचे काम प्रामाणिकपणे करून राज्याच्या व देशाच्या उन्नतीत योगदान द्यायचे आहे, अशी भावना ज्ञानेश्वरी यांनी व्यक्त केली.