MPSC Success Story गावातील मुले उच्च शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी बनतात. तेव्हा कळतं – नकळतपणे पुढील अनेक पिढ्या घडवत असतात. त्यामुळे, गावातील मुलांना शिक्षणात भरारी घेण्यासाठी बळ देणे गरजेचे आहे. असेच एक उदाहरण म्हणजे सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी या शेतकरी कुटुंबातील शिक्षकाचा मुलगा शिक्षकाचा मुलगा ऋषिकेश दत्तात्रय नरोडे .तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळवले आहे.
ऋषिकेशने शालेय शिक्षण गावातच केले. त्याला घरच्यांचा संपूर्ण पाठिंबा लाभला. त्याचे वडील हे श्री. नरोडे व्ही एन नाईक संस्थेच्या गोळे गोंधेगाव येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आहेत.वडील विनाअनुदानित शाळेवर शिक्षक म्हणून वीस वर्षे सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीला दोन वर्षाचा कालावधी असतान ते आता अनुदान शाळेची वेतन श्रेणी मिळाली आहे.विना अनुदान शाळेवर शिक्षक असल्याने ऋषिकेश ला धारणगाव (ता. कोपरगाव ) मामाच्या गावाला शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याने इंजिनिअरींगचे क्षेत्र निवडले.केमिकल्स मॅकेनिकल्स इंजिनिअरिंगमध्यें इंजिनिअर पूर्ण केले.
पण अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला सतावत होते. त्यामुळे त्याने कोपरगावच्या आत्मा मलिक ॲकेडमीत स्पर्धा परीक्षा सराव केला. नुसता अभ्यास केला नाहीतर मैदानी सराव देखील केला. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे.गावामध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळणारा पहिला मुलगा ठरला.