⁠
Inspirational

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच यशाचा मार्ग मोकळा होतो. असेच ग्रामीण भागातील मंगेश पवळ याने अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याची वनपरिक्षेत्र अधिकारी पदी निवड झाली. मंगेशचे प्राथमिक शिक्षण ते माध्यमिक शिक्षण हे कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात झाले. 

मंगेश यांचे वडील रमेश पवळ कटिंग सलूनच दुकान चालवतात. तर आई गृहिणी आहे. त्यामुळे घरची परिस्थिती आधीपासूनच जेमतेम होती.पण आपल्या मुलाने शिकून उच्च शिक्षित व्हावे या उद्देशाने त्यांनी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

मंगेश पवळ यांचा लहान भाऊ मयूर यांची एमपीएससी अंतर्गतच पीएसआय पदी नियुक्ती देखील झाली आहे. दोन्ही भावांनी स्पर्धा परीक्षेची तयारी आणि यश मिळवले. मंगेश याने आपले उच्च शिक्षणासाठी त्यांनी थेट पुणे गाठले. त्याने पुणे येथे बी.इ इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली.‌हे शिक्षण चालू असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. २०१६ रोजी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना अनेकदा अपयश देखील आले.पण खचून न जाता पुन्हा अभ्यास केला. 

यामुळेच, मंगेळ पवळ याची वनपरिक्षेत्र अधिकारी जिल्ह्यातील कडा या गावात राहणारा मंगेश पवळ  (एमपीएससी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. ही गावासाठी अभिमानाची बाब आहे. त्याची (वनपरिक्षेत्र अधिकारी) अर्थात रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदी नियुक्ती झाली आहे. सध्या तो हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत आहे.

Related Articles

Back to top button