आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत शिवा झाला पोलिस उपअधीक्षक ‘क्लास वन’ अधिकारी !

Published On: ऑक्टोबर 10, 2024
Follow Us

आपली परिस्थिती कशीही असली तरी परिस्थितीशी झगडता आले पाहिजे. शिवा शेळके याची परिस्थिती ही बेताची होती. विडी कामगार म्हणून राबणारी आई आणि पेंटर काम करुन उदरनिर्वाह करणार्‍या वडिल….अशोक व शांता शेळके यांचे चिरंजीव संतोष (शिवा). त्याचे शालेय शिक्षण हे कोतुळेश्वर विद्यालयात झाले.

लहानपणापासून हुशार असल्याने त्याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तर पुढील शिक्षण हे संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात झाले, तेथेही तो प्रथम तर नंतर नासिक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ही तो प्रथम आला होता. त्याच्या अभ्यासातील सातत्याने त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला.

शिवाने अहोरात्र अभ्यास केलाण तब्बल सहा वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर त्याला आशेचा किरण सापडला आणि त्याची क्लास टू मधून मंत्रालयीन कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. त्याच वेळी २०२२ च्या एका परीक्षेचा निकाल काही अंतरावर लागणार होता, तो निकाल हाती येताच त्याची राज्य विक्रीकर आयुक्त पदी निवड झाली, त्यानंतरही त्याने परीक्षा देणे चालूच ठेवले. आता नुकत्याच जाहीर झालेल्या २०२३ च्या निकालात तो क्लास वन अधिकारी झाला.

आताच्या निकालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत ४७ वी रँक मिळवत पोलिस उपअधीक्षक ‘क्लास वन’ अधिकारी झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025