---Advertisement---

कष्टाची जाणीव ठेवत कल्याणीचा MPSC परीक्षेतील यशस्वी प्रवास…

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : खरंतर स्वप्ने नुसती उराशी बाळगून चालत नाही तर त्याला कष्ट आणि जिद्दीची जोड हवीच. कल्याणीच्या घरची परिस्थिती बेताची होती….अगदी पत्राचे लहानसे घर, लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आली. तिच्या आईने धुणी- भांडी करून मुलांना उच्च शिक्षण दिले.

कल्याणी आहिरे ही मूळची अहमनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी आहे.तिचे शालेय शिक्षण हे सिद्धार्थ विद्यालय या शिक्षण नगर परिषदेचेच्या शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात आणि त्यानंतर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

या संपूर्ण प्रवासात तिच्या आईचा पाठिंबा होता…तिची आई दिवसा चार घरी धुनी भांडी आणि रात्री उशिरापर्यंत घरात मशीनवर ब्लाऊज शिवण्याचं काम करत मुलांच्या संगोपनासाठी कल्याणीच्या आईने प्रयत्न केले. घरची परिस्थिती बेताची असताना देखील कल्याणीने जिद्दीने अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा द्यायचे ठरले. जिद्दीने अहोरात्र मेहनत देखील घेतली.

म्हणूनच कल्याणी आहिरे हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय. सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता वर्ग एकच्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कल्याणीने यश मिळवले आहे. आईची मुलांच्या शिक्षणासाठी धडपड आणि कल्याणीच्या जिद्दीला यश मिळाले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts