⁠  ⁠

सामान्य कुटुंबातील मुलीची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटले की कधी यश येते तर कधी अपयश…पण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नीट समजून घेत, वेळेचे नियोजन केले. तर यशाची पायरी गाठता येते. हेच निफाड येथील देवगावच्या सामान्य कुटुंबातील खुदेजा अशपाक शेख या तरुणीने सिद्ध केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे तिने डी. आर. भोसले विद्यालयात माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले.

नाशिक येथे मविप्र समाजाचे के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात बीएससी कृषी पदवी मिळवली.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून खाजगी नोकरीची संधी न घेता. तिने आठ ते दहा तास अभ्यास करण्याची तयारी ठेवली. यामुळेच ती २०२२ ला पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ४०० पैकी ३१० गुण मिळवून तर तलाठी सरळसेवा पदभरती परीक्षेत २०० पैकी १८५.७७ गुण मिळवून ती दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली.

असे असताना पहिल्या प्रयत्नातच राज्य लोकसेवा आयोगाच्या सेवा परीक्षेत यश मिळवून अवघ्या २५ व्या वर्षीच मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली.इतकेच नाहीतर खुदेजाने राज्यातील ओबीसी प्रवर्गामधून मुलींमध्ये राज्यात प्रथम तर एकूण यादीमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे.

Share This Article