---Advertisement---

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या खुदेजाची MPSC परीक्षेत बाजी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आपण स्पर्धा परीक्षेची तयारी व अभ्यासक्रम नीट समजून घेतला तर यश‌ हे नक्कीच मिळते. नीट वेळेचे नियोजन केले तर कोणत्याही परिस्थितीत यशाचा मार्ग मोकळा होतो. खुदेजाची निफाड तालुक्यातील देवगाव गावात जडणघडण झाली.

सामान्य कुटुंबातील खुदेजा अशपाक शेख या तरुणीने सिद्ध केले आहे. ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पदभरती परीक्षेत २८३ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे. खुदेजाचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे तिने डी. आर. भोसले विद्यालयात माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले. नाशिक येथे मविप्र समाजाचे के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात बीएससी ॲग्रिकल्चर पदवी मिळवली. खुदेजाला खासगी कंपनीत नोकरीची संधी मिळत होती

---Advertisement---

पण शिक्षण आणि अभ्यासाची आवड असल्याने तीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारीपद मिळवून समाज सेवेचा संकल्प केला.२०२२ ला पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ४०० पैकी ३१० गुण मिळवून तर तलाठी सरळसेवा पदभरती परीक्षेत २०० पैकी १८५.७७ गुण मिळवून ती दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली. असे असताना पहिल्या प्रयत्नातच राज्य लोकसेवा आयोगाच्या सेवा परीक्षेत यश मिळवून अवघ्या २५ व्या वर्षीच मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली.खुदेजाने राज्यातील ओबीसी प्रवर्गामधून मुलींमध्ये राज्यात प्रथम तर एकूण यादीमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts