---Advertisement---

कर्जबाजारीमुळे बापाने आत्महत्या केली, पण पोराने अधिकारी व्हायचे स्वप्न केले पूर्ण ! वाचा शेतकरीपूत्राची कहाणी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : साधारण २०११ साल असावं….तसा दुष्काळ पडला होता. वाढते कर्ज व शेतीत न होत असलेल्या उत्पन्नामुळे वडिलांना गळफास लावून आत्महत्या केली. तेव्हा कोमल अवघा १४ वर्षांचा आठवीत होता. यामुळे, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची झाली. लहान बहीण, तो आणि आई…या सगळ्यातून कसे जाणार? पण परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून त्याने शिक्षण तर घेतलेच पण एमपीएससी परीक्षा पण उत्तीर्ण झाला. वाचा या शेतकरीपूत्राची जीवनकहाणी…

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेल्या शेंडा गावाचा कोमल रतन नंदागवळी हा शेतकरी पुत्र एमपीएससीमध्ये यशस्वी झाला. त्याला मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पद मिळाले आहे.

त्याचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण गावच्या शाळेत झाले. हे गावीच झाले. तो दहावीमध्ये प्रथम देखील आला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण भंडारा येथील जे.एम पटेल कॉलेजला झाले. त्याने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले.

यादरम्यान, दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचे मोलमजूरी करायचे चार पैसे कमवून घराला मदत करायचे.आईचे शिक्षण जास्त नसल्याने कष्टाचे काम करीत मुलांचे शिक्षणं करणे हे तिला भाग होते. तिचे हेच कष्ट बघून पोराने देखील देशपातळीवरील ICAR परीक्षा उत्तीर्ण केली. पदव्युत्तर पदवी भ्यासक्रमासाठी इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटरमध्ये शिक्षण पूर्ण केले.

आता उच्च शिक्षण तर झाले पण चांगली नोकरी तर हवी, या उद्देशाने त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. बार्टी मार्फत अशा गरजू युवकांना मार्गदर्शन मिळते. त्यात कोमलने देखील मार्गदर्शन घेतले.तिथे अभ्यास करत असताना त्याला ज्युनिअर रिसर्च फेलोशिप देखील मिळाली पुढे जाऊन पीएचडी करण्याची इच्छा पूर्ण झाली.

हे सारं करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता. ते‌ वाचनालयात बसून दिवसभर अभ्यास करायचे, विविध प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करायचे. त्यांना आपल्यासाठी आई मेहनत घेत आहे. हे डोळ्यांसमोर दिसायचं. त्याची आई अवघी चौथी पास…त्यात आईला हृदयविकार असल्याने जास्त कष्टाचं काम करणे जमत नव्हतं. तरीही मुलांच्या शिक्षणसाठी अहोरात्र मेहनत करत होती. वडील गेल्यानंतर काका- काकू‌ व बहिणीची साथ, आईच्या कष्टाचे चीज‌ यामुळेच त्यांची एमपीएससी मार्फत मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदी निवड झाली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts