---Advertisement---

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून जातो. पण मालाची जीवनकहाणी अनोखी आहे. अर्थात, अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. साधारण २० वर्षांपूर्वी माला ही दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली मुलगी जळगाव येथे पोलिसांना रेल्वेस्टेशन येथे बेवारस स्थितीत सापडली होती. तिच्या आई – वडिलांचा शोध न लागल्याने पोलिसांनी मार्ग काढायचे ठरवले.

त्यात, दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशान्वये पोलिसांनी वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. तिला बाबांनीआपले नाव दिले. इतकेच नाहीतर शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण देखील पूर्ण केले.

---Advertisement---

तिचे शिक्षण परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयात मध्ये चौथीपर्यंत पूर्ण झाले. पुढे आय. एस. गर्ल्स हायस्कूल येथून बारावीची परीक्षा तिने प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली. पुढील उच्चशिक्षणाकरिता तिला अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्रवेश दिला.पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही शिक्षणाकरिता दर्यापूरचे प्रा. प्रकाश टोपले पाटील यांनी पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली.

तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मध्ये २०१८ मध्ये पास झाली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) परीक्षेत उत्तीर्ण झाली.तिला एवढ्यावरच थांबायचे नाहीतर युपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts