⁠  ⁠

गावच्या लेकीने केली कमाल ; MPSC च्या परीक्षेत मिळवले घवघवीत यश !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : खरंतर, कित्येक गावात अजूनही बऱ्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. यात शिक्षणाची कास धरून अधिकारी होते, ही फार मोठी गोष्ट आहे. हेच जामखेड तालुक्यातील मोहा या ग्रामीण भागातील मनिषा सुरेश वाघमारे हिने करून दाखवले आहे.

ती गावातील पहिली महिला पोलिस उपनिरीक्षक बनली असून हे अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा या शाळेत पुर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण प्रदीपकुमार महादेव बांगर उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या ठिकाणी घेऊन नंतर ल. ना. होशिंग विद्यालयात कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. नंतर डि. टी. एड्. ही पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी मिळाली नाही.

म्हणून शिक्षण सोडून न देता पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणाहून पदवीधर ही पदवी प्राप्त केली आहे. पुढे, तिने बी. एड् या पदवीचे शिक्षण सुरू असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.तिने ही तयारी २०१७ पासून सुरू केली.

सुरूवातीला अभ्यास सुरू करत असताना अनेक अडीअडचणींना व समस्यांना तोंड द्यावे लागले. त्या गोष्टींनी खचून न जाता अधिक जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या शारीरिक चाचणीची तयारी करण्यासाठी पुणे येथील दादासाहेब भोरे सरांच्या ॲकॅडमीत तयारी केली.दोन वर्षांच्या अभ्यासानंतर तिने २०१९ मध्ये एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरला व परिक्षेत चांगले गुण मिळवत पोलिस उपनिरीक्षक या पदाला पात्र झाली. एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करत अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला.

Share This Article