---Advertisement---

मानसी पाटील उपजिल्हाधिकारी ; वाचा तिच्या यशाची कहाणी..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

MPSC Success Story यशाचा मार्ग खडतर असला तरी अशक्य नाही. स्पर्धा परीक्षांची विशेष पार्श्वभूमी नसताना देखील नियोजनबद्ध अभ्यास केला तर यश हे मिळतेच. हेच अंमळनेरच्या मानसी पाटील हिने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालून दाखवून दिले आहे.

मानसी पाटील ही मूळची अंमळनेर तालुक्यातील जवखेडे या गावाची लेक. तिचे वडील सुरेश पाटील हे विद्यानिकेतन शाळेत शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. मानसीचे प्राथमिक शिक्षण जळगावच्या अभिनव शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण प. नं. लुंकड कन्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. दहावीला विशेष प्राविण्य मिळवून जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनातून संगणक विषयात पदविका प्राप्त केली. त्यानंतर बांभोरी अभियांंत्रिकी महाविद्यालयात पदवी घेतली.

---Advertisement---

उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. तिची ही तयारी २०१५ पासून चालू होती. सुरुवातीच्या एका परीक्षेत तिची २०१७ मध्ये विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. पण तिला उपजिल्हाधिकारी पद हवे होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. तिने या संपूर्ण प्रवासात सेल्फ स्टडीवर अधिक भर दिला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाचे योग्य नियोजन केले. दररोजच्या घडामोडींसाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून वाचनाचा स्पीड वाढवण्याकडे लक्ष दिले.अखेर, २०१९ मध्ये तिची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.‌ इतकेच नाहीतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts