MPSC Success Story : माणसाच्या जीवनातील प्रत्येक दिवस ही परीक्षा असते. पण मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण हा परीक्षेचा असतो. सुखाची चाहूल शोधताना कित्येक दु:खातून जावे लागते. पण कधी ना कधी मेहनतीचे फळ मिळतेच. अशीच यशोगाथा नरेंद्रची आहे.
नरेंद्रच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई व दोघेही वडील मोलमजुरी करून घर चालवतात. उदरनिर्वाहासाठी व पुढील शिक्षणासाठी पैसे पैसे आणायचे कुठून? या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नरेंद्रने छोटेखानी व्यवसाय करायचे ठरवले. त्याच्या घराच्या जवळच जिल्हा परिषद कार्यालय होते. त्या ठिकाणी त्याने चहाची टपरी चालू केली. रोज मोठे मोठे अधिकारी ये – जा करताना बघून नरेंद्रने पण ठरवले की एकदिवस मी पण अधिकार बनणार….अखेर ते स्वप्न पूर्ण झाले.
पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मराठा हायस्कूल मध्ये पूर्ण केलं. परंतु शिक्षण घेत असताना त्याला घरची परिस्थिती आठवली की शिक्षण नको वाटायचं. म्हणून त्याने मुक्त विद्यापीठातच बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे पॉलिटेक्निक डिप्लोमा केला. नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
नरेंद्र दिवसभर चहाच्या टपरीवर चहा विकायचा आणि रात्री घरी आल्यावर रात्रभर स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. असा हा नरेंद्राचा दिनक्रम प्रेरणादायी आहे. नरेंद्रच्या ह्या अथक परिश्रमापुढे परिस्थितीने देखील हार मानली. त्यावर त्याने यशस्वीपणे मात करत राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इन्कम टॅक्स ऑफिसर झाला आहे. सध्या तो मुंबई येथे इन्कम टॅक्स ऑफिसर या पदावर कार्यरत आहे.