⁠
Jobs

कित्येकदा अपयश आले, पण मेहनतीने प्रसादने मिळवले MPSC परीक्षेत यश !

MPSC Success Story : कोणत्या स्पर्धेत किंवा परीक्षेला शॉर्टकट हा नसतो. त्यामुळे जिद्द आणि चिकाटी उराशी बाळगून यशाचा प्रवास सुरू करायला हा हवाच. तरच आपली स्वप्ने पूर्ण होतात. प्रसाद आव्हाड याने अधिकारी बनायचंच ह्या हेतूने बारा वेळा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पदासाठी मेन्स दिल्या.अखेर, दुय्यम निबंधक परिक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रसाद राज्यात दुसरा आला.

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील प्रसाद प्रकाश आव्हाड हा शेतकरी कुटुंबातील मुलगा. त्यांच्या वडिलांचे प्रकाश आव्हाड यांचे एमपीएसस मधून अधिकारी व्ह्यायचे स्वप्न होते. ते आता त्यांच्या मुलाने पूर्ण केले. यांचा त्यांना सार्थ अभिमान आहे.आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले हीच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला ९ वर्षाच्या प्रवासात कित्येक वेळा अपयशी आले, पण घरचे कायम पाठीशी राहिले. त्याचे वडील त्यांना कायम सांगायचे, आपल्या हातात प्रयत्न करणे आहे, समय से पहले भाग्य से अधिक किसिको कुछ नही मिलता. त्यांनी हाच मंत्र लक्षात ठेवला.

त्याचे प्राथमिक शिक्षण सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण एकलव्य आश्रमशाळेत झाले. तर पाचवी ते आठवीचे माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून देवळ्यातील विद्या निकेतनमधून झाले. तर नववी ते बारावीचे शिक्षण दिंडोरी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले. २०१४ साली पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून पेट्रोलियम इंजिनिरिंगचे पदवीचे शिक्षण घेतले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

प्रसादने २०१५ ला एलआयसीची मुलाखत दिली. २०१६ साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत, २०१७ ला पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा, २०२० ला राज्य सेवा मुख्य परीक्षा, याच वर्षी पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत, २०२१ ला राज्य सेवा मुख्य परीक्षा, २०२१ तसेच २०२२ साली वनसेवा मुख्य, २०२२ ला दुय्यम निबंधक, याच वर्षी राज्य कर निरीक्षक परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक, २०२३ ला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षेस पात्र ठरल्यानंतर यश मिळत नव्हते.अखेर २१ डिसेंबर २०२३ रोजी अनुसूचित जाती प्रवर्गातून दुय्यम निबंधक (वर्ग – २ अधिकारी) पदाला गवसणी घालत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नसतेच. हे प्रसाद याने दाखवून दिले आहे.

Related Articles

Back to top button