⁠  ⁠

अनेक वेळा अपयशाने आले, तरी हिंमतीने अभ्यास केला अन् झाला प्रशासकीय अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, अपयश येत असते. यात सातत्य आणि मेहनत गरजेची आहे. एखाद्या अडचणींवर कशी मात करायची? हे परिस्थितीच ताकद देत असते. आदिवासी भागात शिक्षण घेऊन देखील प्रसाद आव्हाड यांनी वर्ग २ हे पद मिळवले. हा त्याचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. अधिकारी बनायचंच ह्या हेतूने बारा वेळा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पदासाठी मेन्स दिल्या.

त्या प्रत्येकवेळी अपयश आले पण पुन्हा हिंमतीने अभ्यास करत राहिला. प्रसाद हे मूळचा निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी.त्याचे शालेय शिक्षण हे सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण एकलव्य आश्रमशाळेत झाले. पाचवी ते आठवीचे माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून देवळ्यातील विद्या निकेतनमधून झाले. तर नववी ते बारावीचे शिक्षण दिंडोरी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयातून झाले. २०१४ साली पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून पेट्रोलियम इंजिनिरिंगचे पदवीचे शिक्षण घेतले.

एमपीएससी मधून अधिकारी व्ह्यायचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने तयारीला सुरुवात केली.२०१५ ला एलआयसीची मुलाखत दिली. २०१६ साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत, २०१७ ला पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा, २०२० ला राज्य सेवा मुख्य परीक्षा, याच वर्षी पुन्हा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत, २०२१ ला राज्य सेवा मुख्य परीक्षा, २०२१ तसेच २०२२ साली वनसेवा मुख्य, २०२२ ला दुय्यम निबंधक, याच वर्षी राज्य कर निरीक्षक परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक, २०२३ ला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षेस पात्र ठरल्यानंतर यश हुलकावणी देत गेले.

वडील कायम सांगायचे, आपल्या हातात प्रयत्न करणे आहे. हे त्याने कायम लक्षात ठेवले. या साऱ्या संयमाची परीक्षा त्याने सिद्ध करुन दाखवले. शेवटी, दुय्यम निबंधक परिक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रसाद राज्यात दुसरा आला.त्याने आव्हाड परिवाराचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले.

Share This Article