अपयश आले तरी खचून न जाता ‘स्मार्ट स्टडी’ करून बनले उपजिल्हाधिकारी !
MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटले की, पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही कधी अपयश येते, निराशा येते. पण जिद्द व चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर हे यश निश्चितच मिळतेच. अपयश आले तरी खचून न जाता दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील उपजिल्हाधिकारी रामदास दौंड यांचा हा प्रेरणादायी प्रवास….त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षेचे खुळ डोक्यात पक्के होते. प्राथमिक शिक्षण गावाकडे झाल्यानंतर त्यांचे अकरावी व बारावीचे शिक्षण अहमदनगर या ठिकाणी झाले. गावी बऱ्यापैकी शेती असल्याने शेतीची आणि कामाची आवड होतीच. त्यामुळे त्यांनी बीएससी कृषी करायचे ठरवले.
हा महाविद्यालयीन पातळीवर अभ्यास चालू असताना स्पर्धा परीक्षा देखील द्यायला हवी हे त्यांनी निश्चित केले. पण घरची परिस्थिती बेताची….आता पैसे आणणार तरी कुठून? परत क्लास, रूमचा अधिक खर्च कसा भागवायचा? कुटुंबाला देखील हा खर्च देणे परवडणारे नव्हते. म्हणून त्यांनी एग्रीकल्चर कॉलेजमध्येच हॉस्टेलवर राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयाला कॉलेजकडूनही बरेच सहकार्य मिळाले. कधी लायब्ररीमध्ये तर कधी रूमवर असा रोजचा दिनक्रम सुरू ठेवला. यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. कारण, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा होता.
अपयशाच्या मागे यश लपलेले असते म्हणतात ते खरं आहे…२०१७ मध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा दिल्यावर अयशस्वी ठरले. पण काहींच्या चूका परत न होऊ देता. त्यांनी अधिक जोमाने अभ्यास केला त्यानंतरच्या वर्षे ते एक नाहीतर तीन शासकीय परीक्षा पास झाले. त्यांना जाणवले की अजून मेहनत घेतली तर नक्कीच उपजिल्हाधिकारी होईल. याच चिकाटीच्या जोरावर रामदास दौंड हे उपजिल्हाधिकारी झाले. याविषयी सांगताना म्हणतात की, “प्रत्येकाने स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटले पाहिजे. नुसता अभ्यास करून चालणार नाही तर ‘स्मार्ट स्टडी’ करायला हवा”