---Advertisement---

सातत्य असेल तर यश मिळतेच; रोहिणीचे MPSC च्या परीक्षेत घवघवीत यश!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story सध्या स्पर्धा परीक्षेत देखील दिवसेंदिवस अधिक स्पर्धा वाढत चालली आहे. अशा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्य आणि कायम एकाग्रता असणे आवश्यक आहे. रोहिणी सोळुंके ही शेतकरी कुटुंबात वाढलेली लेक.जवळपास सहा वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना यशाने हुलकावणी दिली. मात्र, हिंमत न हारता अभ्यासातील सातत्याने अखेर रोहिणी यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये ‘शाळा निरीक्षक प्रमाणित आणि संस्था'(राजपत्रित वर्ग 2 अधिकारी) या पदी निवड झाली आहे.

रोहिणी ही गोंदी या गावातील लेक. तिचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषदेचे शाळेत झाले. तर माध्यमिक आणि उच्चशिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. मग तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे महागडे क्लास लावणे तर शक्य नव्हते. मग तिने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी छोटी – मोठी कामे केली.

इतकेच नाहीतर कुटुंबावर आर्थिक भार नको म्हणून त्यांनी २०१७ पासून खाजगी शिकवणीतून आपला खर्च भागवला. स्व- अध्ययनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी केली. अखेर, तिच्या कष्टाचे चीज झाले.तिची ‘शाळा निरीक्षक प्रमाणित आणि संस्था’ या राजपत्रित अधिकारी वर्ग २ पदी त्यांची निवड झाली आहे. अपयश येत असतानाही अभ्यासात सातत्य ठेवत रोहिणी यांनी मिळवलेले यश नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts