रोशनने एमपीएसी परीक्षेत यश मिळवून केले कुटुंबियांचे नाव ‘रोशन’ !
MPSC Success Story : आपल्याला जर कुटुंबाची साथ असेल तर यशाची पायरी सहज गाठता येते. हेच रोशन याने करून दाखवले. रोशन चट्टे हा चिंचवड येथील रस्टन कॉलनीत राहाणारा लेक. त्याचे वडील खाजगी कंपनीत कॅन्टीन सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे. रोशनचे प्राथमिक ते पदवी शिक्षण हे चिंचवडमध्येच झाले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. सुरूवातीला युपीएससीसाठी प्रयत्न केला.
काही गुणांसाठी मुख्य परीक्षेत यश हुकले. पुन्हा परीक्षा दिली तर पुन्हा अपयश आले. म्हणून ते एमपीएससीच्या दिशने वळले. इकडेही दोनदा प्रयत्न केला पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुख्य परीक्षेत काही गुणांनी संधी गेली. त्यात लॉकडाऊन लागले. या काळात त्याने मराठी व इंग्रजीचा पाया मजबूत केला. इतर पेपरचा सराव केला. त्यामुळे त्यांना लॉमध्ये ५५ पैकी ५२ गुण मिळाले.
तर मुख्य परीक्षेत ३०७ गुण मिळाले.पण कोरोना असल्याने परीक्षा चार – पाच वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यात निकालही उशीरा लागला. पण तिसऱ्या प्रयत्नात रोशन पोलिस उपनिरीक्षक झाला. भविष्यात तो क्लास वन साठी प्रयत्न करणार आहे.